सतीश भोसलेचं घर जाळलं? परिवाराची काय चूक? अजंली दमानिया यांची पोस्ट

अंजली-दमानिया-पोस्ट-सॅटिश-भोसाले-खोक्या-भौ-हौस-बर्न्ट-डाऊन-ड्यूट-ड्यूट-ए-ए-द-फोर्मिलिस-फॉल्ट

भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ ‘खोक्याभाऊ’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या आलिशान ग्लास हाऊसवर देखील वन विभागाने गुरुवारी बुलडोझर चालवला. अशातच रात्रीतून काही अज्ञातांनी सतीश भोसलेच्या कुटुंबीयांना मारहाण केली आणि त्याचं घर पेटवून दिलं. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न विचारले आहे.

अंजली दमानिया यांनी X या सोशल नेटवर्किंग पोस्ट करत खेद व्यक्त केला आहे. ‘सतीश भोसले चे घर जाळलं? का ? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला?’, असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.

‘हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं ? नाही हे योग्य नाही’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.