‘भावाला खुन्नस देऊन बघतो…’, रागातून तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला, CCTV व्हिडिओ कॅमेऱ्या
बार्शी: बार्शीमध्ये एका टोळक्याने एका तरूणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी शहरात टोळक्याकडून तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे, भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. मांगडे चाळ परिसरात 11 मार्चच्या 8.30 रात्री वाजता हा प्रकार घडला आहे. तक्रारदार रामेश्वर रामगुडे आणि त्यांचा मावस भाऊ सोमनाथ शिंदे घरासमोर बसलेले असताना दुचाकीवर येऊन मारहाण करण्यात आली.
आरोपी कन्हैया ढाळे, कृष्णा ढाळे, सुरज धोत्रे आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी फायटर पंच, दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही अशी देण्यात धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. मांगडे चाळ परिसरात 11 मार्चच्या 8.30 रात्री वाजता हा प्रकार घडला आहे. लोखंडी फायटर पंच, दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही अशी देण्यात धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.