IPL च्या 17 हंगामांत 15 ट्रॉफी फक्त 7 संघानीच जिंकल्या, बाकीच्या संघाचं काय?
गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात पराभूत करत आयपीएलच्या सतराव्या हंगामाची ट्रॉफी जिंकली होती. कोलकत्ता संघ दहा वर्षानंतर आयपीएल चॅम्पियन बनला. याआधी त्यांनी 2014 मध्ये आयपीएल किताब जिंकला होता.
इंडियन प्रीमियर लीग 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे. पहिला सामना ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात खेळला जाणार आहे. आयपीएल 2025 हंगामात 10 संघात 65 दिवसांमध्ये अंतिम सामना धरून एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत.
मागच्या हंगामातील विजेता कोलकाता संघाने शानदार पद्धतीने किताब जिंकला होता. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये खेळला गेलेल्या ह्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्सचा 8 विकेट्सने पराभव केला होता. याआधी त्यांनी 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकली होती.आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त किताब मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी 5- 5 वेळा आयपीएल ट्रॉफी त्यांच्या नावावर केली आहे. कोलकाताने 3 वेळा (2012, 2014,2024) तसेच राजस्थान रॉयल्स संघाने (2008) मध्ये तर सनरायझर्स हैदराबादने (2016) मध्ये आणि गुजरात टायटन्स (2022) तर डेक्कन चार्जर्स (2009) यांनी एक वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. 17 हंगामात एकूण 7 संघांनी आयपीएल स्पर्धा जिंकली आहे 5 संघांनी 15 ट्रॉफी जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू , गुजरात लॉयन्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पुणे वॉरियर्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोच्ची पोस्टर्स केरला या संघांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.
आयपीएल स्पर्धेत आत्तापर्यंतचे विजेते संघ
2008 राजस्थान रॉयल्स
2009 डेक्कन चार्जर्स
2010 चेन्नई सुपर किंग्ज
२०११ चेन्नई सुपर किंग्ज
2012 कोलकत्ता नाईट रायडर्स
2013 मुंबई भारतीय
2014 कोलकत्ता नाईट रायडर्स
2015 मुंबई इंडियन्स
2016 सनरायझर्स हैदराबाद
2017 मुंबई इंडियन्स
2018 चेन्नई सुपर किंग्ज
2019 मुंबई इंडियन्स
2020 मुंबई इंडियन्स
2021 चेन्नई सुपर किंग्ज
2022 गुजरात टायटन्स
2023 चेन्नई सुपर किंग्ज
2024 कोलकाता नाईट रायडर्स
Comments are closed.