युजवेंद्र चहलचा धक्कादायक निर्णय, आता भारताबाहेर जाऊन क्रिकेट खेळणार?

भारतीय संघाचा दिग्गज लेग स्पिनर युजवेंद्र चहल याने मोठा निर्णय घेतला आहे. चहलने आता दुसऱ्या देशात जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युजवेंद्र चहल काउंटी चॅम्पियनशिप 2025 मध्ये परत एकदा नॉर्थम्पटनशायर संघासाठी खेळण्याची तयारी करत आहे. युजवेंद्र चहल आयपीएल 2025 हंगामानंतर जून मध्ये नॉर्थम्पटनशायर संघात सामील होणार आहे. युजवेंद्र चहल काउंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कप दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. त्यांचा पहिला सामना 22 जून रोजी मिडलसेक्स‌ संघाशी होण्याची शक्यता आहे.

युजवेंद्र चहलने 2024 मध्ये सुद्धा नॉर्थम्पटनशायर संघासाठी काउंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कप मध्ये सहभाग घेतला होता. युजवेंद्र चहलने वनडे कपमध्ये केंट विरुद्ध पदार्पण करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने यानंतर काउंटी चॅम्पियनशिप मध्ये डर्बीशायर विरुद्ध एका सामन्यात 99 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या होत्या. जे त्याच्या करिअरमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं. युजवेंद्रने 41 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 33. 19 च्या सरासरीने 115 विकेट्स घेतल्या आहेत.

यादरम्यान युजवेंद्र चहल म्हणाला, मी मागच्या हंगामात इंग्लंडच्या काउंटी हंगामात खूप एन्जॉय केले होते. त्यामुळे मी येथे परत येण्यासाठी आनंदी आहे. त्या ड्रेसिंग रूम मध्ये काही खूप चांगली माणसे आहेत आणि मी पुन्हा एकदा त्यांच्यामधील हिस्सा बनण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही हंगामाच्या शेवटी चांगलं क्रिकेट खेळलं होतं. त्यामुळे मला आशा आहे की, आम्ही पुन्हा तसंच खेळू‌ आणि जिंकू. आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल सर्वात जास्त 205 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

युजवेंद्र चहलने ऑगस्ट 2023 मध्ये भारतासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. युजवेंद्र चहल टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा हिस्सा होता. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.नॉर्थम्पटनशायरचे नवे प्रशिक्षक डैरेन लेहमैनने युजवेंद्र चहलच्या पुनरागमनावर भाष्य केले. ते म्हणाले मी आनंदी आहे., की जगातील सर्वश्रेष्ठ लेग स्पिनर यांच्यापैकी एक असलेला चहल या हंगामात नॉर्थम्पटनशायर संघासाठी परत येत आहे. तो खूप अनुभव घेऊन जाताना परत जातो. तसेच युजवेंद्र एक साधा माणूस आहे, जो खेळावर खूप प्रेम करतो. जून पासून हंगामाच्या शेवटपर्यंत त्याचं आमच्या संघासाठी खेळणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

Comments are closed.