IPL चा असा परिणाम? भारत आता एकाच वेळी 3 संघ मैदानात उतरवणार?

भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला आरसीबी संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि फिनिशर दिनेश कार्तिक याने भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य केल आहे. होळीच्या खास दिवशी दिनेश कार्तिक म्हणाला की, आयपीएलने भारतीय क्रिकेटची उंची एका वेगळ्या स्तरावर नेली आहे. भारतीय संघ आता एका वेळेस एकाच स्तरावरच्या 3 नॅशनल संघ मैदानावर उतरू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे क्रिकेट निर्देशक मो बोबाट आणि इंग्लंडची माजी क्रिकेटर इशा गुहा यांच्याशी बोलताना दिनेश कार्तिक याने भाष्य केले. भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलल्यावर आणि पाया भक्कम करण्यामध्ये आयपीएलची भूमिका खूप मोठी आहे.‌असे तो म्हणाला. तसेच तो पुढे म्हणाला आयपीएलने आमच्या सर्व खेळाडूंमध्ये जिंकण्याची मानसिकता तयार केली आहे. पैसे आणि आर्थिक फायद्यांमध्ये सुद्धा पाया मजबूत झाला आहे आणि खेळाचा दर्जा ही उंचावला आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला, आम्ही म्हणू शकतो की, आयपीएल स्पर्धा आल्यानंतर आता भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट एका वेळेस दोन किंवा तीन संघ उतरवू शकतो. भारताकडे एकापेक्षा एक खेळाडूंचे भंडार आहे. मी आयपीएल मध्ये माझ्या पहिल्या वर्षात ग्लेन ‌मैकग्रा याच्यासोबत खेळलो होतो आणि त्याच्यासोबत सराव करून माझ्यात सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास आला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही वेळा बीसीसीआयने एकावेळी भारताच्या दोन संघांना ‌खेळण्यासाठी उतरवले आहे. तसेच आत्ता जेव्हा टीम इंडिया आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर याच्या नंतर इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मायकल वॉन हे म्हणाले होते की , भारताचा बी संघ सुद्धा ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकत होता.

आयपीएल स्पर्धेमधून भारतीय संघात काही कमालीचे खेळाडू आले आहेत. यामध्ये फिरकीपटू वरूण चक्रवर्तीच नाव सगळ्यात आधी आपल्या मनामध्ये येत. कारण भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यामध्ये त्याने खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे. याशिवाय अभिषेक शर्मा सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे सुद्धा आयपीएल मधून भारतीय संघात आले आहेत.

Comments are closed.