कोण म्हणतं पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा आहे? 45 जण मैदानात, एकही विकला नाही!
द हंड्रेड लीग मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा घनघोर अपमान झालेला आहे. द हंड्रेड लीगच्या ड्राफ्ट मध्ये 50 पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंनी त्यांचं नाव रजिस्टर केलं होतं, ज्यामध्ये 45 पुरुष खेळाडू आणि 5 महिला खेळाडू सामील होत्या. सर्वात जास्त अपमानित करणारी गोष्ट ही आहे की, इमाद वसीम, सॅम अय्युब, शादाब खान, नसीम शाह, आणि हसन अली यांच्यासारखे मोठे खेळाडू सुद्धा अनसोल्ड ठरले. तसेच महिला खेळाडू बद्दल बोलायचे झाल्यास आलिया रियाज, फातिमा सना आणि इराम जावेद सहित पाच खेळाडूंवरही बोली लागली नाही. तसेच ही गोष्ट पाकिस्तानसाठी खूप लाजिरवाणी आहे आणि ह्याचा त्यांच्यावर चांगलाच परिणाम होऊ शकतो.
मागच्या हंगामापर्यंत द हंड्रेड लीगच्या संघांचा मालकी हक्क इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाकडे होता. पण आताच्या आगामी हंगामात एकूण 8 संघांमधील 4 संघांना आयपीएल फ्रॅंचाईजी यांनी भागीदारी मध्ये खरेदी केले आहे. हेही मोठं कारण असू शकतं की, पाकिस्तानी खेळाडूंना ऑक्शनमध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही. मुंबई इंडियन्सने ओव्हल इनव्हिसिबल्स संघामध्ये 49 प्रतिशत भागीदारी खरेदी केली होती. तसेच लखनऊ सुपर जायंट्सने मँचेस्टर ओरिजिनल्स मध्ये 70 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.
याशिवाय सनरायजर्स हैदराबाद संघाचा मालकी हक्क असणाऱ्या सन ग्रुपने नॉर्थन सुपर चार्जर्सचा पूर्ण मालकी हक्क प्राप्त केला आहे.
आयपीएल 2008 मध्ये शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि सोहेल तनवीर असे दिग्गज खेळाडू खेळताना दिसले होते. पण 2009 नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमधून बैन करण्यात आले. पण वसीम अकरम आणि रमीज राजा असे नामवंत खेळाडू कॉमेंटेटर म्हणून आयपीएल स्पर्धेशी जोडलेले आहेत. एसए20 लीग मध्ये सर्व 6 संघांचा मालकी हक्क आईपीएल फ्रेंचाइजी यांच्याकडे आहे. त्या लीगमध्येही पाकिस्तानचा कोणताही खेळाडू खेळत नाही.
Comments are closed.