IPL 2025; सर्वात वयस्कर कर्णधार कोण? पहा सर्व संघाच्या सेनापतींचे वय

आयपीएल 2025 साठी स्टेज सज्ज झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा 18वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल 2025चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. याआधी, सर्व 10 संघांनी त्यांचे कर्णधार जाहीर केले आहेत. शुक्रवारी, दिल्ली कॅपिटल्सने फिरकीपटू अक्षर पटेलला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

आयपीएल 2025 मध्ये एकूण पाच संघ नवीन कर्णधारांसह प्रवेश करतील. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. दिल्लीने अक्षर पटेलला, लखनऊने रिषभ पंतला, पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला, आरसीबीने रजत पाटीदारला आणि केकेआरने अजिंक्य रहाणेला संघाची धुरा दिली आहे. अशा परिस्थितीत, आता जाणून घ्या आयपीएल 2025 मध्ये सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण कर्णधार कोण आहे.

आयपीएल 2025 मधील सर्वात वयस्कर कर्णधार अजिंक्य रहाणे आहे. रहाणेकडे केकेआरची कमान आहे. तो 36 वर्षांचा आहे. तर, 18 व्या हंगामातही, सर्वात तरुण कर्णधार शुबमन गिल आहे. गिल 25 वर्षांचा आहे. तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. आयपीएल 2025 मधील बहुतेक कर्णधार 31 वर्षांचे आहेत. अक्षर पटेल, पॅट कमिन्स, रजत पाटीदार आणि हार्दिक पंड्या हे 31 वर्षांचे आहेत. तर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर हे 30 वर्षांचे आहेत. रिषभ पंत 27 वर्षांचा आहे आणि ऋतुराज गायकवाड 28 वर्षांचा आहे.

सर्व 10 संघांचे कर्णधार किती वर्षांचे आहेत ते पहा

1. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल (31 वर्षे)
2. सनरायझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स (31 वर्षे)
3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार (31 वर्षे)
4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (30 वर्षे)
5. पंजाब किंग्ज – श्रेयस अय्यर (30 वर्षे)
6. लखनौ सुपर जायंट्स – रिषभ पंत (27 वर्षे)
7. मुंबई इंडियन्स – हार्दिक पांड्या (31 वर्षे)
8. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे (36 वर्षे)
9. गुजरात टायटन्स – शुबमन गिल (25 वर्षे)
10. चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुरत गायकवाड (28 वर्षे)

Comments are closed.