21 वर्षांनी सचिन खेडेकर रंगभूमीवर

अभिनेते सचिन खेडेकर यांनी आपल्या चतुरस्र अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 21 वर्षांनंतर सचिन खेडेकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन होत आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. ‘भूमिका’ असे नाटकाचे नाव आहे. नाटकात खेडेकर कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता आहे. अद्याप तरी त्यांच्या व्यक्तिरेखेची माहिती गुलदस्त्यात आहे. तसेच नाटकातील अन्य कलाकारांचीही माहिती लवकरच उघड केली जाईल. क्षितिज पटवर्धन यांनी नाटकाचे लेखन केले आहे. सध्या नाटकाच्या तालमी सुरू आहेत. दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांची ही नवी कलाकृती लवकरच येणार आहे.

Comments are closed.