ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन, बॉलीवूडवर शोककळा

ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी (83) यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून देब मुखर्जी आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, देब मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार मंडळी उपस्थित होती.

अभिनेते देब मुखर्जी यांचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला. त्यांची आई सतीदेवी ही अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार यांची एकुलती एक बहीण होती. देब यांचे भाऊ जॉय मुखर्जी हे अभिनेते तर शोमू मुखर्जी हे निर्माते होते. शोमू मुखर्जीचे लग्न अभिनेत्री तनुजाशी झाले होते. काजोल आणि राणी मुखर्जी त्यांच्या पुतण्या आहेत. देब मुखर्जी यांची मुलगी सुनीता हिचे लग्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी झाले तर त्यांचा मुलगा अयान हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेते देब मुखर्जी यांनी बऱयाच चित्रपटात काम केले होते. ‘बातों बातों में’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘कराटे’, ‘जो जीता वही सिकंदर’ अशा बऱयाच चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण अभिनय क्षेत्रात त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. ‘कमीने’ या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते.

Comments are closed.