देवाची कृपा; महाराष्ट्रात कायदा कुव्यवस्था, बीडच्या निलंबित पोलिसांसोबत न्यायमूर्तींची धुळवड

धुळवड साजरी करताना डावीकडून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि वर्तुळात न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले.

देशभरात रंगपंचमी उत्साहात साजरी होत असताना आज बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याने निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांसोबत या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश बेधुंद होऊन नाचले. एकमेकांवर रंगांची उधळण करत त्यांनी बीडच्या परंपरेप्रमाणे फोटोही काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रात कायदा ‘कु’व्यवस्था ही ‘देवा’ची कृपा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींसोबत संबंध असल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे, तर तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. देशमुख प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी या निलंबित पोलिसांबरोबर आज रंगपंचमीचा आनंद साजरा केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याचा पह्टो सोशल मीडियावर शेअर केला.

भाजीपाले यांच्याकडून हा खटला काढून घेऊन दुसऱ्या न्यायाधीशाकडे सोपवण्यात यावा, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. न्यायाधीशांना काही आचारसंहिता असतात आणि त्याप्रमाणेच त्यांना वागावे लागते,’ असे दमानिया यांनी म्हटले आहे.

Comments are closed.