चेन्नई-मुंबई नव्हे, तर या खेळाडूंनी जिंकल्या आहेत सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी, नाव पाहून थक्क व्हाल!
आयपीएल म्हणजे फक्त एक क्रिकेट स्पर्धा नाही, तर ती भारतीय चाहत्यांसाठी एक उत्सव आहे. या स्पर्धेत दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित होतात, जुन्या रेकॉर्ड्स मोडल्या जातात. पण काही विक्रम असे आहेत, जे सहजासहजी कोणालाही मोडता आले नाहीत.
असाच एक ऐतिहासिक विक्रम रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांच्या नावावर आहे.आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. या दोघांनीही प्रत्येकी 6 आयपीएल विजेतेपदं जिंकली आहेत. या विक्रमामुळे हे दोघेही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू ठरले आहेत. (Most IPL trophies by a player)
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तसेच त्याने डेक्कन चार्जर्स संघासोबत 2009 मध्ये एक विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एकूण 6 विजेतेपदं आहेत. (Rohit Sharma IPL titles record)
अंबाती रायडूने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांकडून खेळताना विजेतेपदं मिळवली आहेत. मुंबई इंडियन्स संघासोबत त्याने 3 वेळा आणि चेन्नई सुपर किंग्स संघासोबत 3 वेळा आयपीएल जिंकली. त्यामुळे त्याच्या नावावर देखील 6 विजेतेपदं आहेत. (Ambati Rayudu IPL wins history)
रायडूच्या निवृत्तीनंतर आता रोहित शर्माकडे आणखी एक संधी आहे, आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विजेतेपद असलेला एकमेव खेळाडू होण्याची! जर तो आणखी एक ट्रॉफी जिंकला, तर तो एक असा विक्रम प्रस्थापित करेल, जो भविष्यात मोडणे खूप कठीण होईल.
या विक्रमामुळे रोहित आणि रायडू या दोघांच्याही आयपीएल कारकिर्दीला एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला अनेकवेळा अडचणींमधून बाहेर काढत यशस्वी कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. तर, अंबाती रायडूने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे.
Comments are closed.