मस्क यांच्या स्टारलिंकसमोर सरकारची अट

अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची एन्ट्री हिंदुस्थानात लवकरच होणार आहे, परंतु त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्यासमोर हिंदुस्थानात एक कंट्रोल सेंटर उभारावे लागेल, अशी अट ठेवली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि टेलिकम्युनिकेशनची सेवा खंडित किंवा बंद करण्यासाठी याचा वापर करता येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सॅटेलाईट परवान्यासाठी स्टारलिंकचा अर्ज सध्या अंतिम टप्प्यात आहे. कंपनीचे मार्केटिंग आणि नेटवर्क वाढवण्यासाठी रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबत स्टारलिंकने नुकताच करार केला आहे. इंटरनेट नेटवर्कसाठी कंट्रोल सेंटर असणे गरजेचे आहे. देशात ज्या भागात कायदा-सुव्यवस्था बिघडली, त्या भागातील कम्युनिकेशन सेवा तात्काळ खंडित करता येऊ शकते. स्टारलिंकचे मुख्यालय हे अमेरिकेत आहे. त्यामुळे भविष्यात अशी वेळ आल्यास अमेरिकेत जाऊन दार ठोठावण्याची वेळ येऊ नये, यासाठी एक कंट्रोल सेंटर असणे गरजेचे आहे, असे हिंदुस्थानने म्हटले आहे.
Comments are closed.