इराणमध्ये महिलांवर ठेवली जातेय ड्रोन, अ‍ॅपद्वारे नजर; UN चा धक्कादायक अहवाल, कारण वाचून धक्का बसेल

इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे बंधनकारक आहे. यासाठी कायदाही करण्यात आलेला आहे. कायदा मोडणाऱ्या महिलांवर कारवाईही केली जाते. अर्थात हिजाबविरोधात महिलांचा एक गट वेळोवेळी आंदोलनही करतो. मात्र आता याचबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. इराणमध्ये महिलांवर ड्रोन आणि अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जात असल्याचा अहवाल यूएनने दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हिजाबबाबतच्या कायद्याचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून इराण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. महिलांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन, कॅमेरे आणि चेहरा ओळखणाऱ्या अ‍ॅपचा सरकारकडून वापर केला जात आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे.

इराण सरकारने आर्टिफिशिय इंटेलिजन्सचा वापरही सुरू केला आहे. याद्वारे महिला आणि तरुणींवर नजर ठेवली जात आहे. तसेच एका अॅपद्वारे हिजाब न वापरणाऱ्या महिलांचे चेहरा, त्यांच्या वाहनाचा नंबर, लोकेशनची माहितीही गोळी केली जात असून नंतर त्या महिलेला नोटीस पाठवली जात आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.