मुंबई संघाची ही खेळाडू जिंकू शकते ऑरेंज कॅप , जाणून घ्या किती मिळणार बक्षीस?

महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील आज अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. मुंबईची खेळाडू नट साइवर-ब्रंटने पूर्ण स्पर्धेच्या हंगामात शानदार फलंदाजी केली आहे. मुंबई संघाला अडचणीच्या परिस्थितीतीतून बाहेर काढले आहे. ब्रंट सध्या 493 धावा करून तसेच ऑरेंज कॅपच्या रेसमधे सर्वात पुढे आहे. जर तिला ऑरेंज कॅप भेटली तर तिला बक्षीस म्हणून किती रक्कम देण्यात येईल? तिला करोडो रुपयांचे बक्षीस मिळेल का? जाणून घ्या

ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता मुंबईची खेळाडू नट साइवर-ब्रंट सर्वात पुढे आहे. तिने 9 डावात आतापर्यंत 493 धावा केल्या आहेत. हंगामात तिची सरासरी 70.43 इतकी आहे. आतापर्यंत स्पर्धेत तिने एकूण 5 अर्धशतक केली आहेत. जर ती ऑरेंज कॅप जिंकू शकली तर तिला बक्षीस म्हणून 5 लाख रुपये देण्यात येतील. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला एका ट्रॉफी बरोबरच 5 लाख रुपये देण्यात येतात.

मागच्या वर्षी बद्दल बोलायचे झाल्यास, महिला प्रीमियर लीगच्या 2024 ची विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 6 करोड रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. तसेच 2025 स्पर्धेतील विजेत्या संघाला मिळणारी रक्कम बीसीसीआय कडून अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. पण यावेळेस देखील विजेत्या संघाला 6 करोड रुपये देण्यात येतील. तसेच मागच्या वर्षी उपविजेत्या संघाला 3 करोड रुपये देण्यात आले होते.

महिला प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला होता. या सामन्यात मुंबईने दिल्लीला 7 विकेट्सनी पराभूत केले होते. आता 2 वर्षानंतर दिल्लीकडे पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

Comments are closed.