चॅम्पियन्स ट्रॉफीचा हिरो असुरक्षित! वरुण चक्रवर्तीला अज्ञात व्यक्तींकडून धमक्या

क्रिकेटच्या दुनियेत रातोरात हिरो कसे बनले जाते, हे सध्या वरूण चक्रवर्ती शिवाय कोण जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो. साल 2021 मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केलं होतं. पण 2021 टी20 वर्ल्ड कप नंतर त्याला टीम इंडिया मधून बाहेर करण्यात आले होते. तेव्हा कोणाला माहितही नसेल की 4 वर्षानंतर हाच गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 किताब जिंकण्यामध्ये भारतीय संघासाठी एवढी मोठी कामगिरी करेल. चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 9 विकेट्स घेतल्या. पण एक वेळ अशी ही होती, जेव्हा त्याला धमकीचे फोन येत होते.

एका पॉडकास्टमध्ये चर्चा करताना वरूण चक्रवर्तीने सांगितले की, 2021‌ टी20 वर्ल्डकपची वेळ त्याच्यासाठी खूप खराब होती. तो म्हणाला, की तेव्हा माझ्या खराब प्रदर्शनामुळे लोकांनी मला खूप ट्रोल केले आणि तेव्हा अशी परिस्थिती झाली होती की, मला धमक्यांचे फोन येत होते आणि मी डिप्रेशन मध्ये चाललो होतो.
2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वरूण चक्रवर्तीने 3 सामने खेळले होते. ज्यामध्ये एकूण 11 षटके गोलंदाजी करून त्यालाही एकही विकेट घेता आली नाही.

वरूण चक्रवर्तीने त्या खराब आठवणी सांगत म्हटले की, 2021 टी20 वर्ल्डकप नंतर मी भारतामध्ये पुन्हा परत आलो नाही, कारण मला तेवढे धमक्यांचे फोन येत होते. लोक म्हणत होते की, तू भारतात येण्याचा विचार करु नकोस. त्या लोकांनी माझ्या घराचा पत्ताही शोधून काढला होता. तसेच एअरपोर्टवरून येताना मी पाहिले की, लोक गाडीवरून माझा पाठलाग करत होती. पण मी समजू शकतो की चाहते आपल्यावरती प्रेम करतात. त्यामुळे त्यांना रागवण्याचाही तेवढाच हक्क आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. अशात इंग्लंडच्या विरुद्ध वनडे सामन्यात वरूण चक्रवर्तीला खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये त्याने शानदार अशी गोलंदाजी केली. तसेच इंग्लंडच्या विरुद्ध वनडे सामन्यात त्याने निवडकर्त्यांना खूप प्रभावित केले. त्यामुळे वरूण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

Comments are closed.