बुमराह, सॅमसन आणि मयंक आयपीएलमध्ये परतणार का? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट!

आगामी इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. पण या हंगामात असे तीन खेळाडू आहेत, जे खेळाडू खेळतील का नाही यात शंकाच आहे. तसेच आता अपडेट समोर आली आहे मुंबई इंडियन्सचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या करणारे मैदानापासून लांब आहे. याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव सुद्धा पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकत नाही. यासोबतच संजू सॅमसनची सुद्धा हीच अवस्था आहे.

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचा शानदार यष्टीरक्षक फलंदाज आहे. यासोबतच तो या संघाचा कर्णधार सुद्धा आहे. संजू इंग्लंड विरुद्ध टी20 मालिकेदरम्यान दुखापती झाला होता. यानंतर त्याच्या अंगठ्याची सर्जरी करण्यात आली होती, तो सध्या ठीक आहे. तसेच आगामी आयपीएल स्पर्धेत तो राजस्थानसाठी खेळू शकतो. सध्या तो नॅशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये आहे आणि सराव करत आहे.

जसप्रीतने मुंबई इंडियन्ससाठी खूप वेळा कमालीची कामगिरी केली आहे. पण तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान दुखापती झाला होता. जसप्रीतला पाठीमध्ये दुखत असल्याने त्याला त्रास होत होता. तो फिट नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमधून तो बाहेर होता. आता आगामी आयपीएल स्पर्धेत सुद्धा तो उशिरा खेळू शकतो. अजून तो पूर्णपणे फिट झालेला नाही. तसेच याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लखनऊ संघाचा घातक वेगवान गोलंदाज मयंकने कमी वेळात त्याचं नाव मोठ्या उंचीवर नेलं आहे. त्याच्या वेगामुळे त्याला जास्त ओळखलं जातं. पण मागच्या हंगामादरम्यान दुखापतीच्या कारणाने तो स्पर्धेमधून बाहेर झाला होता. मयंक सध्या बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये आहे. तो तिथे आवेश खान आणि मोहसीन खान यांच्यासोबत स्वतःच्या फिटनेसवर काम करत आहे. मयंकच्या पुनरागमनाबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

Comments are closed.