मुंबईच्या खेळाडूला सुवर्णसंधी, डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात नव्या विक्रमाची नोंद होणार?

महिला प्रीमियर ली 2025 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंटस संघाच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यांनी 47 धावांनी विजय मिळवला. आता अंतिम सामना शनिवारी मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट एक मोठा रेकॉर्ड मोडू शकते. तिच्याकडे स्पर्धेतील 1000 धावा करण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन संघाची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत ती वरच्या स्थानी आहे. तिने आत्तापर्यंत 28 सामन्यात 997 धावा केल्या आहेत यादरम्यान तिने 8 अर्धशतक सुद्धा झळकावली आहेत. आता तिच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे नॅट सायव्हर ब्रंट महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात 1000 धावा करणारी पहिली खेळाडू ठरवू शकते. हा टप्पा पार करण्यासाठी तिला फक्त 3 धावांची गरज आहे.

नॅट सायव्हर ब्रंटने या हंगामात सुद्धा शानदार प्रदर्शन केल आहे. तिने आत्तापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यात 493 धावा केल्या आहेत. तसेच या हंगामात सर्वात जास्त धावा करण्यामध्ये ती सर्वात वरच्या स्थानी आहे. तिने या हंगामात 80 चौकार आणि चार षटकार लावले आहेत. यादरम्यान तिची सर्वश्रेष्ठ खेळी 80 धावांची आहे.नॅट सायव्हर ब्रंटने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार अशी पारी खेळली होती. आजच्या अंतिम सामन्यात सुद्धा दिल्ली विरुद्ध ती मोठा विक्रम करू शकते.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:-

मुंबई इंडियन्स : हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नट साईकर ब्रेंट, हरमनप्रीत कौर (कर्नाधर), अमनजोट कौर, यस्तिका भाटिया (यश्तार रक्ष), साजीवान साजना, जी कमलीनी, संसृति गुप्ता, शाब्निम इस्कमैल

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्नाधर), शेफली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमा रॉड्रिग्ज, अण्णाबेल सॅडरलँड, मारियाझैन कप, सारा ब्राईस (यश्तार रक्षक), निक्की प्रसाद, मनीनु मनी, शीख पंडे, टीटीस सदू/एन.

Comments are closed.