अक्षर पटेल कर्णधारपदी विराजमान, केएल राहुलने खास शैलीत दिली प्रतिक्रिया!
आगामी आयपीएल 2025 स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या कर्णधारपदी अक्षर पटेलची नियुक्ती केली आहे. त्याआधी असं मानलं जात होते की, दिल्लीचा कर्णधार के एल राहुल असणार आहे. याआधी पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे. पण आता अक्षरची नियुक्ती झाल्यानंतर दिल्लीमध्ये सामील असलेल्या केएल राहुलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या काय म्हणाला के एल राहुल?
उजव्या हाताचा अष्टपैलू अक्षर पटेल 2019 पासून दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये खेळत आहे. तेव्हापासून संघासाठी त्याने 82 सामने खेळले आहेत. संघाने त्याला आयपीएल 2025 साठी 16.50 करोड रुपयांना विकत घेतले आहे. तसेच संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत ला त्यांनी मेगा लिलावात खरेदी केले नाही. मेगा लीलावात के एल राहुल ला 14 करोड रुपयांना दिल्लीने खरेदी केली. याआधी त्याने पंजाब आणि लखनऊची धुरा सांभाळली आहे. रिपोर्ट्स मध्ये दावा करण्यात येत आहे की, राहुलने कर्णधार बनण्यासाठी नकार दिला. ज्या नंतर अक्षर पटेलला दिल्लीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली.
दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षर पटेलला नवीन कर्णधार घोषित केले आहे. या पोस्टवर के एल राहुलने कमेंट केली आहे तो म्हणाला, अभिनंदन बापू. यांना नव्या आव्हानासाठी तुला खूप शुभेच्छा आणि मी कायम तुझ्या सोबत आहे.
अक्षर पटेलने 2014 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केलं होतं. 30 वर्ष असलेला अष्टपैलू आयपीएलमध्ये 150 सामने खेळलेला आहे. यामध्ये अक्षर पटेलने 1753 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 123 विकेट्स आहेत.
Comments are closed.