सोन्याला झळाळी, दर 91 हजाराच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीने गाठला एक लाखाचा टप्पा

सोन्या चांदीत आता जबरदस्त तेजी आली आहे. शेअर बाजार सातत्याने घसरत असताना सोने-चांदीचे दर नवनवे उच्च्यांक गाठत आहे. आता सोने 9० हजाराचा टप्पा गाठला असून चांदीने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. मागील दोन महिन्यात सोन्याचा दर तब्बल 10 हजारांनी वाढले आहेत.
सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असून, गेल्या दोन महिन्यांत सोने तब्बल दहा हजार रुपयांनी वधारले आहे, तर चांदी लाखापार गेली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सोन्याच्या आयातशुल्कात घट केल्यानंतर सोन्याचे दर कमी होत 75 हजारांवरून 70 हजार रुपये प्रतितोळ्यावर आले होते. मात्र, अल्पावधीतच ते पूर्वस्थितीला आले. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडी, सणवार, लग्नसराई या कारणांमुळे सोने दरात वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर सोन्यात अधिक तेजी दिसून आली. आर्थिक क्षेत्रातील अनिश्चितता वाढल्याने लोक सोन्यातील पारंपरिक गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मागणी वाढून सोने वधारत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्याचे दर तब्बल 10 हजरा रुपयांनी वाढले आहेत.
जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कर धोरण, यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. गुरुवारी सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 91 हजाराच्यावर गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 84,590 रुपयांचा स्तर गाठला आहे. सोन्याप्रमाणे चांदीतही तेजी असून चांदीचे दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. दरात एक हजार रुपयांनी वाढ होत चांदीचे दर 1 लाख 1 हजार 200 रुपयांवर पोहोचले.
सुवर्ण बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दर 91 हजार 464 रुपये प्रतितोळा झाला आहे. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे ओढा वाढल्याने सुरू असलेल्या दरातील तेजीने शुक्रवारी सर्वोच्च उच्चांक गाठला.
Comments are closed.