DC vs MI Final: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने मुंबईला दिले फलंदाजीचे आमंत्रण
यंदाचा महिला प्रीमियर लीगचा हंगाम (Women Premier League) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (15 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स संघात फायनलचा थरार रंगणार आहे. दरम्यान दोन्ही संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर अटीतटीची लढत पाहायला मिळेल. त्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ सज्ज आहेत. तत्पूर्वी या फायनल सामन्याचा टाॅस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, डब्ल्यूपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4-2 असे वर्चस्व गाजवले आहे. पण दोन्ही संघ पहिल्याच हंगामात फायनलमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने दिल्लीला धूळ चारत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-
मुंबई भारतीय-हॅले मैथथुझ, यस्तिका भाटिया (यशरक्षक), नेट सायरी ब्रेन्टेड, हरमनप्रीत कौर (कर्नाधर), साजीवान सजना, अमानजोट कौर, सांस्कृति गुप्ता, सायका इशक, अमेलिया केर, जी. कमिलिनी
दिल्ली कॅपिटल्स- मेग लॅनिंग (कर्नाधर), शेफली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अण्णाबेल सडरलँड, मार्जन कप, जेस जोनासेन, सारा ब्रायस (यश्तार रक्ष) निक्की प्रसाद, मिन्नू मनी, शीख पंडे, नलापुरडी
Comments are closed.