भारतीय सिनेमात डेविड वॉर्नरचे पदार्पण, पहिला लुक आणि रिलीज डेट जाहीर!

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. तो रॉबिन हुड चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात त्याचा रोल चा पहिला लूक समोर आला आहे. वॉर्नर त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल खूप उत्सुक आहे. भारतीय प्रेक्षकही या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रॉबिनहूड चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला. त्याने म्हटले की त्याला या चित्रपटाचे चित्रीकरण खूप आवडले. त्याने लिहिले, “भारतीय चित्रपट, मैं है आ गया हूं. रॉबिनहूडचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला या चित्रपटाचे चित्रीकरण खूप आवडले.

डेव्हिड वॉर्नरने त्यांच्या पोस्टमध्ये हे देखील सांगितले की रॉबिनहूड चित्रपट कधी प्रदर्शित होईल? त्यांनी लिहिले की, हा चित्रपट 28 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होईल.डेव्हिड वॉर्नरला भारत आणि भारतीय चित्रपट खूप आवडतात. आयपीएल दरम्यान तो इथे येतो तेव्हा त्याला खूप मजा येते. त्याने अनेकदा भारताला आपले दुसरे घर म्हटले आहे. वॉर्नर अनेकदा सोशल मीडियावर टॉलीवूड आणि बॉलिवूड गाणी शेअर करतो.

प्रसिद्ध अभिनेता नितीन हा तेलुगू चित्रपट ‘रॉबिनहूड’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो एका चोराच्या भूमिकेत असेल जो गरिबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो. चित्रपटाची कथा हनीभोवती फिरते जो कोणत्याही वैयक्तिक अजेंड्याशिवाय केवळ धैर्य आणि निर्भयतेने प्रेरित होऊन अनेक दरोडे करतो.

डेव्हिड वॉर्नर चे आंतरराष्ट्रीय करिअर :

तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 110 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 8786, 6932 आणि 3277 धावा केल्या आहेत.

Comments are closed.