मोटरसायकलच्या धडकेत नेरळ रेल्वे गेट तुटले; अडीच तास वाहतूक बंद

मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन येथील नेरळ पाडा गेट मोटरसायकलच्या धडकेने तुटले आहे. त्यामुळे फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. यावेळी कर्जत आणि मुंबई दिशेने अपडाऊन धावणाऱया मेल, एक्सप्रेस, रेल्वे ट्रेन सिग्नल न मिळाल्याने थांबून राहिल्या होत्या. मध्य रेल्वेकडून त्या मोटरसायकल चालकावर गुन्हा नोंद करीत मोटरसायकल रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतली होती. तब्बल अडीच तासानंतर रेल्वे सेवा सुरळीत धावू लागली.
नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे गेट नंबर 27 हे फाटक नेरळ कळंब या राज्य मार्गात आहे. हे फाटक नेरळ पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारे महत्वाचे फाटक आहे. त्यामुळे दिवसभर या फाटकातून वाहनांची मोठय़ा प्रमाणत वर्दळ सुरू असते. आज दुपारी एक वाजता नेरळ पूर्व भागातून नेरळ बाजार पेठ येथे येणारा प्रवासी प्रतीक मोहिते हा मोटरसायकल वरून चालला असताना बंद फाटकाला धडकला.यामुळे गेट तुटल्याने येणाऱया ट्रेनला सिग्नल मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही मार्गातील लांब पल्ल्याच्या तर त्या मागून धावणाऱया ट्रेन या थांबून राहिल्या. तुटलेले गेट दुरुस्तीसाठी रेल्वे कर्मचारी धावून आले. परंतु तब्बल दोन तास उलटून येथे गेट दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने मोटार वाहतूक दामत मार्गे वळवण्यात आली होती. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर देखील झाला होता. दरम्यान या घटनेत मोटरसायकल चालक देखील जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेल्वे विभागाने प्रतीक मोहिते या तरुणावर कारवाई करीत मोटरसायकल ताब्यात घेतली आहे.
किल्ल्यावर मुंबईतील दोन तरुणांना भरले गेले
मुंबई परिसरात राहणारे जयदीप गुप्ता आणि त्याचा मित्र श्रीधर हे सकाळच्या सुमारास माथेरान येथील प्रसिद्ध पेब किल्ला या गडावर नेरळ येथील माणगाव वाडी या पायवाटेने गेले होते. दरम्यान सायंकाळी हे तरुण परतीच्या प्रवासादरम्यान घरी येत असताना अंधारात त्यांना फायबर सापडली नाही. जयदीप गुप्ता याने संपर्क साधून आम्ही दोघेही किल्ल्यावर अडकल्याचे सांगितले. त्याचा मित्र श्रीधर याला चालण्यास त्रास होत आहे. त्यातच अंधारात पायवाट सापडत नसल्याने त्याने गडावरील अवशेष सूचना फलक येथे अडकून पडल्याचे मोबाईल वरून कळवले आहे. याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. तर पोलीस प्रशासन देखील मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments are closed.