नृत्य, किंवा मी तुला आग लावतो!

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे पुत्र तेजप्रतापसिंग यादव यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. होळीच्या दिवशी ते आपल्या मित्रमंडळींसह नाचगाणी करत होते. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या एका पोलीसालाही त्यांनी एका गाण्याच्या तालावर नाच करण्याची आज्ञा केली. गणवेशात असलेल्या त्या पोलीसाने प्रथम या आज्ञेकडे दुर्लक्ष केले. तथापि, तेजप्रताप यादव यांनी आपला हेका सोडला नाही. ‘ए सिपाही, एक गाना बजायेंगे उसपे तुमको ठुमका लगाना है. नही लगाया तो सस्पेंड हो जायेंगे’ असे त्यांनी त्या पोलिसाला सुनावले. त्यामुळे त्याने काहीकाळ गाण्यावर नाचण्याचे कृत्य केले. ‘बुरा मत मानो, होली है’ असे उद्गारही त्यांनी नंतर काढले. मात्र, या प्रकारावर संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांनी जोरदार आक्षेप घेतला. अशा वृत्तीला बिहारमध्ये स्थान नाही, अशी टीका संजदचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी केली. आश्चर्य म्हणजे लालू यादव यांचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही यासंबंधी नाराजी व्यक्त केली.

Comments are closed.