रोगांचा एक भांडार
आपल्या हातात नेहमी असणारी एक वस्तू अनेक आजार आणि विकारांचे मूलस्थान आहे. ही वस्तुस्थिती असूनही आपल्यापैकी बहुतेकांना याची कल्पनाही नसावी हे आश्चर्यकारक आहे. विशेषत: मुलांना या वस्तूमुळे अनेक आजार आणि व्याधी होऊ शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. काहींनी तर असे मत व्यक्त केले आहे, की आपल्या शौचगृहातील टॉयलेट सीटही या वस्तूपेक्षा अधिक स्वच्छ असू शकते. ही वस्तू आहे आपण नेहमी जवळ ठेवतो तो आपला मोबाईल हँडसेट.
सर्वसाधारणपणे आपण आपल्या घरात आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखतो. घर स्वच्छ असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते. स्वच्छतेमुळे आपण आजारांपासून दूर राहतो. तथापि, आपल्या मोबाईल हँडसेटची स्वच्छता आपण क्वचितच करतो. त्यामुळे आपल्या हँडसेटवर जंतूंचे थरच्या थर साचलेले असतात. आपण आपला हँडसेट कोठेही ठेवतो आणि कोणत्याही विचार न करता तो हातात घेतो. याच हाताची बोटे आपण नकळत तोंडात घालतो किंवा त्याच हातांनी खाण्याचे पदार्थ खातो. त्यावेळी हे जंतू मोठ्या संख्येने आपल्या तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. मोबाईलची हाताळणी आपण इतक्या सहजतेने करतो, की अन्य कोणतीही वस्तू आपण इतक्या वेळा आणि सातत्याने हाताळत नाही. नेमकी हीच वस्तू आपल्या प्रकृतीला घातक ठरु शकते, याची जाणीवही आपण ठेवत नाही. आपला मोबाईल हँडसेट हे विविध रोगांचा आगार आहे, असे तज्ञ म्हणतात. ही बाब अनेक प्रयोगाअंती सिद्ध झालेली असल्याने ती गंभीर आहे.
मोबाईल प्रमाणे रिमोटही अशाच प्रकारे रोगांचा प्रसार करतो. रिमोट तर अनेक हातांमध्ये नेहमी जात असतो. मोबाईल आपण स्वत:चा स्वत:च उपयोगात आणतो. पण रिमोट घरातील सर्वांसाठी एकच असतो. त्यामुळे तो मोबाईल हँडसेटपेक्षाही घातक आहे, असे तज्ञांचे मत आहे. विशेषत: लहान मुलांच्या हाती तो देऊ नये, अशी तज्ञांकडून सूचना केली जाते. याला उपाय असा की या वस्तू नेहमी स्वच्छ sवल्या पाहिजेत. यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग केला पाहिजे. तसे केल्यास आपले आरोग्य सुरक्षित राहील आणि या वस्तूंचा उपयोग आपण कोणत्याही अपाय न होता करु शकू, असे तज्ञ आवर्जून सांगतात.
Comments are closed.