पाकिस्तानी विमानाचे चाक हवेतच गायब झाल्याने खळबळ

पाकिस्तानी विमानाचे एक चाक हवेतच गायब झाल्याने एकच खळबळ माजली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाने उड्डाण केले, मात्र एक चाक गायब झाल्याचे पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला. कराचीहून लाहोरला जात असलेले पीके-306 या विमानाचे एक चाक गायब झाले की चोरी झाली याची चौकशी केली जात आहे. लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली असता मागचे एक चाक गायब होते.
विमानाने कराचीहून उड्डाण केले तेव्हा विमानाची सर्व चाके चांगल्या स्थितीत होती, मात्र लाहोरमध्ये विमान उतरल्यावर लाहोरच्या एअर ट्रफिक पंट्रोलला एक चाक नसल्याची माहिती मिळाली. तसेच कराची विमानतळावर चाकाच्या कवचाचा काही भाग जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, कराचीच्या धावपट्टीदरम्यान ही घटना घडली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.