छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य; नव्
सातारा : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलेलं पहायला मिळालं. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चागलंच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्व दिलं नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले?
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, राजकारणासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि नंतर जातीयवादी पक्ष म्हणतात. पण, आपण हा खोटारडेपणा ओळखला पाहिजे. काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असतं. त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करायला हवा. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला, गडकिल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथे जिथे पाऊल खुणा आहेत, त्यांना जितकं महत्त्व दिले तेवढे काँग्रेसच्या राजवटीत कधीही झालेले नाही, हे आम्ही बघितलेले आहे. आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो, माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते. पण, कधीही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला जेवढं लोकांपर्यंत आणायला हवं होतं, तेवढं आणलेलं नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगजेबाची कबर हटवा, विश्व हिंदू परिषद आक्रमक
मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता भर पडलीय ती विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाची. औरंगजेबची कबर तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. यासंदर्भात तिथीनुसार उद्या शिवजयंतीच्या दिवशी औरंग्याची कबर (Aurangzeb kabar) हटाव मोहीम हाती घेण्यात येईल. औरंगजेबाची कबर न हटवल्यास, कारसेवा करु अशा इशारा बजरंग दलाकडून (Bajrang Dal) देण्यात आला आहे. शिवजयंतीला राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=odop9hft81o
अधिक पाहा..
Comments are closed.