बेंगळुरूमध्ये जप्त केलेल्या 75 कोटी रुपयांची औषधे
मंगळूर शहर पोलिसांची कारवाई : देशभरात एमडीएमएची विक्री करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दोन महिलांना अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 75 कोटी ऊपयांचे एमडीएमए जप्त केले आहे. राज्य पोलिसांच्या इतिहासातील अमली पदार्थ जप्त करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत देशभरात एमडीएमएची विक्री करणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकी महिलांना अटक करण्यात आली. बेंबा फेंटा उर्फ अॅडोनिस (वय 31) आणि अबिगाली अॅडोनिस (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
‘ड्रग्ज फ्री मंगळूर’ बनवण्यासाठी मंगळूर सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळूर शहरासह अन्य राज्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकी महिला नागरिकांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 75 कोटी किंमतीचे 37.870 किलो अवैध ड्रग्जसह इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती मंगळूर शहर पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी दिली.
मंगळूर पूर्व पोलीस स्थानक अंतर्गत पंपवेलजवळील एका लॉजवर नागरिकांना ड्रग्ज विकणाऱ्या हैदर अली याला 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून 15 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले होते. मंगळूर पूर्व पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज तस्करांचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास मंगळूर सीसीबी युनिटकडे वर्ग करण्यात आला होता.
मंगळूर सीसीबी पोलिसांनी तपास हाती घेत या प्रकरणात हैदर अली आणि इतर व्यक्तींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बेंगळुरात राहत असलेल्या नायजेरियन देशाच्या पीटर याला अटक केली. तसेच त्याच्याकडून 6.248 किलो एमडीएमए जप्त करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
या प्रकरणात पीटरला अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या किंग फिन ड्रग्स तस्करांचा माग काढण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून मंगळूर सीसीबी पोलीस सतत ऑपरेशन राबवत होते. या प्रकरणात, परदेशी महिला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात एमडीएमए विमानाने दिल्ली ते बंगळुरू आणि देशाच्या इतर भागात नेली जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, परदेशी महिला मोठ्या प्रमाणात एमडीएमए विमानाने दिल्लीहून बेंगळूरसह देशाच्या इतर भागात नेली जात असल्याची माहिती मिळाली होती. बेंगळुरातील पेडलर पीटरला अमली पदार्थाचा पुरवठा करणारे आरोपी 14 मार्च रोजी दिल्लीहून बेंगळूरला विमानाने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळूर सीसीबी पोलिसांच्या पथकाने बेंगळुरात येऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बेंगळूरच्या इलेक्ट्रॉनिक सिटी जवळील निलाद्री नगर येथे सीसीबी पोलिसांनी संशयितांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून दोन ट्रॉली ट्रॅव्हल बॅगमध्ये आणलेले 75 कोटी ऊपयांचे 37.878 किलो एमडीएमए जप्त केले. याशिवाय 4 मोबाईल, 2 ट्रॉली बॅग, 2 पासपोर्ट, 18,460 रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
संशयितांनी हे अमली पदार्थ असलेले एमडीएमए विमानाने दिल्लीहून बेंगळूर व इतर ठिकाणी जाऊन नायजेरियन नागरिक व इतर लोकांना मोठ्या प्रमाणावर विक्री करून पैसे कमवून ऐषारामी जीवन जगत होते. या आरोपींनी गेल्या वर्षभरात 59 वेळा परदेशातून देशात फिरले असून या प्रकरणात एमडीएमएची वाहतूक करण्यात आली होती का, याचा तपास सुरू आहे. विमानतळावर एमडीएमएची किती वाहतूक केली जाऊ शकते याचा तपास केला जाईल, असे मंगळूर शहर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
Comments are closed.