RCB ने विराटला कर्णधार का बनवले नाही? जाणून घ्या संघातील खेळाडूचे मोठे वक्तव्य!
आगामी आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने रजत पाटीदारला संघाचा कर्णधार बनवले आहे. मागच्या हंगामापर्यंत फाफ डुप्लेसी आरसीबी संघाचा कर्णधार होता, पण आयपीएलच्या मेगा लिलावाच्या आधी आरसीबीने साउथ आफ्रिकेच्या या खेळाडूला बाहेर केले. यानंतर चर्चा होत होत्या की, विराट कोहली आरसीबीचा कर्णधार असेल. पण ही जबाबदारी रजत पाटीदारला देण्यात आली. आरसीबीने विराटला कर्णधार का बनवले नाही, या प्रश्नाचे उत्तर आरसीबी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने दिले आहे, जाणून घ्या तो काय म्हणाला?
जितेश शर्माच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीने स्वतःच कर्णधार होण्यास नकार दिला. त्यानंतर रजत पाटीदारला कर्णधारपद सोपविण्यात आले. जितेश शर्मा म्हणाला की, रजत पाटीदार निश्चित स्वरूपाने कर्णधार होण्याचा हकदार आहे. या खेळाडूने काही वर्षांपासून आरसीबीसाठी चांगलं प्रदर्शन केलं आहे. मी रजत सोबत खूप क्रिकेट खेळल आहे, मी नक्कीच रजतची मदत करेल. याआधी जितेश शर्मा आरसीबीचा कर्णधार होणार आहे, अशा चर्चा होत होत्या. असं मानलं जात होतं. पण त्यानंतर विराट पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होईल अशा चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं.
मागच्या दिवसात आयपीएल मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला 11 करोड रुपयांना खरेदी केले होते. याआधी पंजाब किंग्सने जितेश शर्माला रिलीज केले होते. आयपीएलच्या मेगा लिहिलावात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर मध्ये जितेश शर्माला खरेदी करण्यासाठी थोडी वादावादी पाहायला मिळाली. जेव्हा जितेश शर्माची किंमत 7 करोड रुपये इतकी झाली, तेव्हा पंजाब किंग्सने राईट टू मॅच कार्ड वापरले, पण यानंतर आरसीबीने जितेश शर्माला 11 करोड रुपयांना खरेदी केले.
Comments are closed.