RCB च्या बाहेर, पण दिल्लीने विश्वास दाखवला! IPL 2025 मध्ये फाफ डु प्लेसिसची मोठी भूमिका!
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये फाफ डुप्लेसीला संघाचा उपकर्णधार घोषित केले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी दिल्लीने अक्षर पटेलला कर्णधार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर करत डुप्लेसीला उपकर्णधार जाहीर केल्याची माहिती दिली आहे. याआधी हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू आरसीबी संघाचा कर्णधार होता.
दिल्ली कॅपिटलद्वारे शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये डुप्लेसी फोनवर बोलताना दिसत आहे, बोलताना तो स्वतः म्हटला आहे की, मी दिल्ली कॅपिटल संघाचा उपकर्णधार बोलत आहे. डुप्लेसीला मागच्या काही दिवसांत मेगा लिलावाच्या आधी आरसीबी संघाने रिलीज केले होते. जेव्हा लिलावाची वेळ आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने 2 करोड रुपयांना खरेदी करून त्यांच्या स्क्वाडमध्ये सामील केले.
डुप्लेसी आयपीएल 2025 स्पर्धेमधील सर्व खेळाडूंमध्ये वयाने मोठा खेळाडू आहे. त्याचे वय आता 40 आहे. वाढलेल्या वयाबरोबरच त्याने त्याच्या खेळाच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. आयपीएल 2023 स्पर्धेमध्ये त्याने 56 च्या सरासरीने 730 धावा केल्या होत्या. तसेच 2024 मध्ये तो केवळ 438 धावा करू शकला. पण त्या हंगामात बेंगलुरु साठी सर्वात जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
आयपीएल मध्ये डुप्लेसीच्या कर्णधार पद पाहिले तर, त्याने 42 सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याने संघाला 21 वेळा विजय मिळवून दिलेला आहे. तसेच 21 वेळा संघाला पराभव पत्करावा लागला आहे. त्याचे आईपीएल करिअर पाहिले तर आत्तापर्यंत त्याने 145 सामन्यात 4571 धावा केल्या आहेत.
Comments are closed.