‘सिंहगर्जना’ मंडळाच्या सोहळ्यात एकीचे दर्शन

सिंहगर्जना मित्र मंडळाच्या वतीने सांताक्रुझ पूर्व चिमनलाल हायस्कूल येथे आयोजित कुणबी समाजाच्या सोहळ्यात एकीचे दर्शन घडले. सामाजिक क्षेत्रात बहुमोल काम करणाऱया मंडळाचे नामकरण ‘सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळ’ रजिस्टर करीत असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आले.

रत्नागिरीमधील कळझोंडी माणसूरवाडीमधील चाकरमानी आणि गावकऱयांनी एकत्र येत यावेळी समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. ललिता कोरी, कमलाकर वीर, यशवंत पाष्टे, गाणसूरवाडी युवा अध्यक्ष गणेश पाष्टे, शाहीर तुषारजी पंदेरे, संगीत मंडळी श्याम वीर, प्रशांत जाधव, विनोद गवंडे, मंडळाचे अध्यक्ष तुकाराम वीर, उपाध्यक्ष एकनाथ निंबरे, सचिव संजय वीर, सहसचिव अजित वीर, खजिनदार अशोक वीर, यादव वीर, नंदकुमार वीर, उपाध्यक्ष एकनाथ निंबरेड यांच्यासह मंडळातील सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे माजी सचिव सुरेश वीर यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Comments are closed.