न्यू इंडिया बँक अपहार प्रकरणी आणखी अटकेची कारवाई होणार

न्यू इंडिया बँक अपहार प्रकरणातील फरार आरोपी अरुणचलम याला अटक झाली असली तरी या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आणखी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत मुख्य आरोपी हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, सोलार पॅनल व्यावसायिक अरुणचलम, त्याचा मुलगा मनोहर, माजी सीईओ अभिमन्यू भोन यांना अटक केली आहे. अरुणचलम हा स्वतःहून पोलिसांना शरण आला असला तरी वस्तुस्थिती वेगवेगळी आहे. दरम्यान, या आर्थिक अपहार प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.
Comments are closed.