महानायकाचा महाकर, एक वर्षाचे उत्पन्न 350 कोटी; 120 कोटी कर भरावा लागणार

वयाच्या 82 व्या वर्षीही महानायक अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. आता सर्वाधिक कर भरणाऱया कलाकारांच्या यादीतही ते सामील झाले आहेत. चित्रपट, जाहिरात, टीव्ही शो अशा विविध माध्यमांतून त्यांनी वर्षभरात 350 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली असून इतक्या मोठय़ा कमाईवर त्यांना तब्बल 120 कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांना आपल्या कमाईवर एकूण 120 कोटींचा कर सरकारला द्यावा लागणार आहे. 15 मार्च रोजी अॅडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता त्यांनी भरला असून हा 52.50 कोटींचा आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांनी तब्बल 71 कोटींचा टॅक्स भरला होता. अभिनयासह रिअल इस्टेटच्या माध्यामातूनदेखील बिग बी बक्कळ कमाई करतात. जानेवारीत त्यांनी 83 कोटी रुपयांना डय़ुप्लेक्स फ्लॅट विकला. हा फ्लॅट चार वर्षांपूर्वी त्यांनी 31 कोटींना खरेदी केला होता. याशिवाय अमिताभ आणि अभिषेक यांनी गेल्या वर्षी मुलुंडला 10 फ्लॅट खरेदी केले असून यापैकी चार अपार्टमेंट अमिताभ बच्चन यांनी खरेदी केले आहेत.

Comments are closed.