1975 मध्ये जन्म … 1975 मध्ये मृत्यू झाला
एखाद्या मोठया वयाच्या माणसाचा जन्म 1975 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यूही 1975 मध्येच झाला, असे जर कोणाचे म्हणणे असेल, तर आपण त्याच्यावर विश्वास न ठेवणे साहजिक आहे. सध्या अशा प्रकारचा एक प्रश्न सोशल मिडियावर प्रसिद्ध होत आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणालाही नेमकेपणाने देता आलेले नाही. ज्या व्यक्तीने हा प्रश्न सोशल मिडियावर प्रसारित केला आहे, त्या व्यक्तीनेही याचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सध्या हा प्रश्न चर्चेचा विषय झाला असून त्यावर अनेक लोक आपली अनेक मते व्यक्त करीत असल्याचे दिसते.
एका वर्षी जन्म आणि त्याच वर्षी मृत्यू हे एखाद्या अर्भकाच्या संदर्भात दुर्दैवाने संभवू शकेल. पण जी व्यक्ती मोठ्या वयाची आहे. म्हणजेच जी व्यक्ती प्रौढ आहे, तिच्या संदर्भात असे घडणे शक्य नाही, असेच सर्वांना वाटेल. असे वाटणे स्वाभाविकही आहे. अनेकांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या कोड्याप्रमाणे हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात रुंजी घालत असल्याचे मात्र, दिसून येते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर वेगवेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या मतानुसार 1975 या वर्षी जन्मलेली ही व्यक्ती वयाच्या 22 व्या वर्षी मृत झाली असावी. कारण प्रश्नात पुढचा जी 1975 ही संख्या दिली आहे, तिच्या प्रत्येक अंकांची बेरीज केली असता ती 22 इतकी होते. एका व्यक्तीचे म्हणणे असे आहे, की या प्रश्नातील व्यक्ती 1975 साली जन्माला आली असावी आणि नंतर अनेक वर्षांनी तिचा मृत्यू ‘1975’ क्रमांकाच्या घरात झाला असावा. त्यामुळे ‘1975 मध्ये जन्म आणि 1975 मध्ये मृत्यू’ अशी या कोड्याची मांडणी करण्यात आली असावी. सध्यातरी हेच उत्तर अनेकांना मान्य होईल, असे आहे. मात्र, या कोड्याने अनेकांना विचार करावयास भाग पाडल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.