काश्मीर-कुपवारात दहशतवादी ठार
हळू हळू ए-एफली व्यक्तीची जखम
► सर्कल संस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खुरमोरा राजवार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. मात्र, काही दहशतवादी फरार होण्यात यशस्वी झाले. फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची दिवसभर मोहीम सुरू होती. कुपवाडामधील राजवार भागातील क्रुम्हुरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून एक असॉल्ट रायफलही जप्त करण्यात आली आहे.
परिसरात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता गृहित धरून नाकेबंदी करण्यात आली. तसेच अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी नागरिकांना घरातच राहण्याचा आणि चकमकीच्या ठिकाणी फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Comments are closed.