Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : नागपूरमधील सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर राज्याचं मुंबई अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर…
Comments are closed.