विकीच्या ’छावा’पुढे ’पुष्पा-2’ झुकला; 31 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची घोडदौड अद्याप सुरू आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ने अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2ला अखेर झुकवत 31 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला छावा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. छावाने भल्याभल्या चित्रपटांना मागे टाकले असून आता पुष्पा-2 आणि स्त्री-2 ला सुद्धा पछाडले आहे. छावाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

छावाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. रविवारी 16 मार्चला 31 वा दिवस होता. या दिवशी छावाने 7.63 कोटी रुपयांची कमाई केली. छावाने आतापर्यंत वर्ल्डवाईड 562.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुष्पा-2 ने 31 व्या दिवशी 4.4 कोटी, श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 ने 5.4 कोटी रुपये कमावले होते. छावाने पाचव्या वीकेंडला सर्वात जास्त कलेक्शन केले. छावाने शुक्रवारी 6.75 कोटी, शनिवारी 7.62 कोटी आणि रविवारी 7.63 कोटी रुपयांसह तीन दिवसात 22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पुष्पा-2 ने पाचव्या वीकेंडला 14 कोटी आणि स्त्री-2 ने 16 कोटी रुपये कमावले होते.

Comments are closed.