राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळलीय, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या दंगलीवरून राज्य सरकारला फटकारले आहे. ”राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळली आहे”, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून नागपूर दंगलीबाबत बोलताना म्हटले की, ”राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे होमटाऊन असलेले नागपूर शहर सध्या या परिस्थितीला सामोरे जातेय”
असा उसळला हिंसाचार
औरंगजेबाची कबर उखडून टाका या मागणीसाठी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन झाले. यानंतर नागपूर महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचा रोषही एका गटामध्ये होता. त्यामुळे वाद आणखीनच वाढत जाऊन हिंसाचार उफाळला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरसावलेले पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांवरही जमावाने दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस, अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले.
Comments are closed.