पालघर जिल्ह्यातील 58 हजार महिला झाल्या ‘लखपती’, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी

पालघर जिल्ह्यातील 58 हजार 662 महिलांचे लखपती होण्याचे स्वप्न अखेर साकारले आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी करून महिलांनी उत्पन्नाचा स्वतः मार्ग शोधला आहे. घरची कामे करून आदिवासीबहुल जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या कष्टाने हे यश मिळवले असून आणखी 14 हजार 593 महिलांनी लखपती बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिलांचे मासिक उत्पन्न सरासरी 9 ते 10 हजार रुपये एवढे झाले आहे.

राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी असलेल्या लखपती दीदी योजनेत पालघर जिल्ह्यातल्या 73 हजार 255 महिलांना या अभियानात समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी मोखाडा, जव्हार, डहाणू, वसई, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि पालघर या आठ तालुक्यांमध्ये एकूण 58 हजार 662 महिला लखपती झाल्या आहेत.

लखपती दीदी अभियानामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो महिलांचे जीवन बदलले आहे. स्वयं-सहाय्यता गट आणि आर्थिक मदतीच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. यामुळे केवळ त्यांचे उत्पन्नच वाढले नाही तर त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावले आहे. पालघर जिल्ह्यात महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

संख्या तलाकुयनाई सा

पालघर- १२,२११, डहाणू ११,५४७, तलासरी – ६,८६२, वाडा – ६,५८६, विक्रमगड – ६,५१७, जव्हार – ६,०३७, मोखाडा – ५,६६३, वसई – ३,२३९,

Comments are closed.