362 विकेट्स घेतल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही! झंझावाती माजी गोलंदाज सध्या भोगतोय तुरुंगवास

पाकिस्तानने निश्चित गोलंदाज तयार केले: सध्या क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये अनेक गोलंदाज नो बॉल आणि वाईड बॉल टाकताना दिसतात. अनेकदा या एक्स्ट्रा धावांमुळे संघाला सामना देखील गमवावा लागतो. काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आयपीएल सारख्या लीगमध्ये या जास्तीच्या दिल्या जाणाऱ्या धावा नेहमीच डोकेदुखी ठरत असतात. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे काही गोलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत एकही नो बॉल टाकलेला नाही. पाकिस्तानचा असाच एक माजी वेगवान गोलंदाज (Pakistan former fast bowler) आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्यात. मात्र, एकही नो बॉल टाकलेला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या

पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार इम्रान खान त्यांच्या भेदक माऱ्यासाठी ओळखला जायचा. त्याने 88 कसोटी सामने तर 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्सही पटकावल्या. मात्र, एकही नो बॉल टाकला नाही, त्याच्या या अॅक्युरिसीचं आजही तितकचं कौतुक होतं.

पाकिस्तानच्या संघाला विश्वविजेता बनवलं

क्रिकेटचे सर्व फॉरमॅट एकत्रितपणे पाहिले तर इम्रान खान पाकिस्तानसाठी सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्यांमध्ये वखार युनूस आणि वसीम अक्रमनंतर तिसरा गोलंदाज आहे. त्याने 26,919 चेंडू टाकले आहेत. त्याने 88 कसोटी सामने तर 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. इम्रान खानने 1971 मध्ये पाकसाठी पदार्पण केले होते आणि शेवटचा सामना 1992 च्या विश्वचषकात खेळला होता. या विश्वचषकात इम्रान खानने पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व करत चॅम्पियन बनवले होते. इम्रान खानची 21 वर्षांची डोळे दिपवणारी कारकिर्द आहे. कपिल देव यांच्या प्रमाणेच इम्रान खान देखील त्याच्या टीमला विश्वचषक जिंकवून देण्यात यशस्वी ठरला.

इम्रान खान सध्या भोगतोय तुरुंगवास

पाकिस्तानचा माजी वेगवान असलेला इम्रान खाननंतर पाकिस्तानचा पंतप्रधान देखील झाला होता. मात्र, पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर सध्या तो तुरंगवास भोगतोय. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर गोळीबार देखील झाला होता. इम्रान खानला भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो सध्या शिक्षा भोगतोय. तो ऑगस्ट 2023 पासून अटकेत आहे. सरकारची गुपिते उघड करण्यापासून ते  भेटवस्तू विकण्यापर्यंत इम्रान खानवर अनेक गंभीर आरोप देखील झाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma: रोहित शर्मा वैतागला, थेट मुंबई विमानतळावरच केली फिल्डिंग सेट, नेमकं काय घडलं?, VIDEO

अधिक पाहा..

Comments are closed.