NZ vs PAK: पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव, किवी संघाचं पारडं जड
आज (18 मार्च) मंगळवारी झालेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातही न्यूझीलंडने त्यांना पराभूत केले होते. या सामन्यात टिम सेफर्टला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 45 धावांची स्फोटक खेळी खेळली. शाहीन आफ्रिदीच्या एका षटकात सेफर्टने चार षटकार मारले. त्याच्यासोबत फिन ऍलननेही चांगली कामगिरी केली. पावसामुळे हा सामना 15-15 षटकांचा झाला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने 13.1 षटकांत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून टिम सेफर्ट आणि फिन ऍलन सलामीला आले. सेफर्टने 22 चेंडूंचा सामना करत 45 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. ऍलनने 16 चेंडूत 38 धावांची खेळी खेळली. त्याने त्याच्या खेळीत 5 षटकारही मारले.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हरिस रौफने 2 विकेट घेतल्या. मोहम्मद अली आणि खुशदिल शहा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सलमान आगाने संघासाठी फलंदाजीत आपली हुशारी दाखवली. त्याने 28 चेंडूंचा सामना करत 46 धावा केल्या. सलमानच्या या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शादाब खानने 14 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता. आता मालिकेतील तिसरा सामना 21 मार्च रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल.
चॅम्पियन ट्राॅफीनंतर पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही पाकिस्तानला दारुण पराभवला सामोरे जावे लागले होते. किवी संघाने पहिला टी20 सामना 9 विकेट्सने आपल्या नावे केला होता.
Comments are closed.