Atul Kulkarni- अभिनेता अतुल कुलकर्णी यांची सरकारवर खरमरीत शब्दात टीका; फेसबुकवर पोस्ट करत काय म्हणाले कुलकर्णी वाचा सविस्तर

अभिनेता अतुल कुलकर्णी यांची ओळख एक चतुरस्त्र कलाकार म्हणून सर्वज्ञात आहे. अतुल कुलकर्णी यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून, या पोस्टमध्ये त्यांनी ‘चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली, की अप्रासंगिक भूतकाळ खोदायला प्रवृत्त केलं जातं’ असं मत मांडलं आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जी अराजकता माजली आहे, यावरच अतुल यांनी थेट भाष्य केलेलं आहे. ही पोस्ट अतिशय बोलकी असून यावर लाइक्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

अतुल कुलकर्णी हे कायम सरकारला परखडपणे सुनावण्यात अग्रेसर राहिले आहेत. अतुल हे कायम आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेतही राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ‘लोक मताची डुबकी’ या मथळ्याखाली एक कविता पोस्ट केली आहे. कविता ही अतिशय बोलकी असून, सद्यस्थितीच्या घडामोडींवर ही कविता उत्तम प्रकाश पाडणारी होती.

‘नटरंग’ चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांनी केलेली भूमिका ही आजही सर्वांच्या स्मरणात आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी त्यांची ओळख प्रेक्षकांना आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी सध्या ते मराठी चित्रपटांमध्ये काम का करत नाही याबद्दल परखडपणे बोलले होते.

अतुल कुलकर्णी यांनी नुकतीच कुंभमेळा सुरु असताना ही कविता केली होती. कविता पुढीलप्रमाणे आहे. मतं गर्दी करतात मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात. लोक रडतात भेकतात अशा आशयाची ही कविता त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अतुल कुलकर्णीने कायम समाजातील विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतो. सध्याच्या घडीला त्याने केलेली कविता अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

अतुल कुलकर्णी हा कायम विविध विषयांवर आपली मतं व्यक्त करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अतुल कुलकर्णीने ‘वेडी आशा’ या कवितेच्या माध्यमातून मतदार म्हणून आपण कुठे चुकतो हे मांडलं होतं. अतुल कुलकर्णी हा कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे सध्याच्या घडामोडींवर कवितेच्या माध्यमातून त्याने सद्यस्थितीवर परखड भाष्य केले आहे.

Comments are closed.