IPL मध्ये खेळाडू नाही, तर अंपायरही कमावतात लाखो रुपये! आकडे पाहून थक्क व्हाल

आगामी आयपीएल स्पर्धेच्या 18व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात 6 असे खेळाडू असतील ज्यांना 20 करोड रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पगार मिळू शकतो. लखनऊ सुपर जायंट्सने यावेळेस सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. त्यांनी ऋषभ पंतला 27 करोड रुपयांना खरेदी करून आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू ठरवले आहे. पण या सामन्यांच्या दरम्यान अंपायर यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. तसेच त्यांना या कामासाठी किती पैसे मिळतात याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल.

आयपीएल मध्ये सर्व अंपायर यांना एकसारखा पगार मिळत नाही. त्यांचा पगार या गोष्टीवर निर्भर असतो की, कोणत्या अंपायरकडे किती अनुभव आहे किंवा कोणता सामना आहे. नॉक आऊट किंवा लीग स्टेज मध्ये नव्या आणि जुन्या अंपायर यांच्या पगारांमध्ये खूप मोठे अंतर असते. अनिल चौधरी नामांकित आयपीएलच्या अंपायरमध्ये एक आहे. त्यांना 100 पेक्षा अधिक सामन्यांच्या अंपायरिंगचा अनुभव आहे. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी 1,98,000 इतका पगार मिळतो. नितीन मेनन, ब्रूस ओक्सनफोर्ड यांच्यासहित काही नामांकित अंपायरंना प्रत्येक सामन्यासाठी 1,98,000 इतका पगार मिळतो.

तसेच कमी अनुभव असलेल्या अंपायर यांना प्रत्येक सामन्यासाठी 59 हजार रुपये मिळतात. या यादीमध्ये भारतीय अंपायर वीरेंद्र शर्मा सुद्धा आहेत. तसेच असे सांगितले जात आहे की, इंडियन प्रीमियर लीग मध्ये एका हंगामात अंपायरिंगसाठी अंपायर तब्बल 7,33,000 हजार रुपये इतकी कमाई करतात. याचबरोबर फेमस अंपायर स्पॉन्सरशीप डील मधून सुद्धा मोठी कमाई करतात. प्लेऑफ सामन्यादरम्यान अंपायर यांना बोनस सुद्धा दिला जातो. आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या दिवशी एकच सामना खेळला जाईल.

Comments are closed.