हिंसाचारामुळे एका रात्रीत सगळं बदललं, नागपूरच्या फ्लायओव्हरचं काम ठप्प होणार, जाऊन घ्या कारण

नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी घडलेल्या हिंसाचारानंतर चिटणीस पार्क आणि अवतीभवतीच्या भागांमध्ये काल झालेल्या गदारोळाचा विकास कामांवरील अत्यंत विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण काल ज्या भागात तोडफोड, जाळपोळ, दगडफेक झाली होती, त्या भागातून नागपूरच्या (Nagpur News) विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल जात आहे. सध्या या उड्डाणपुलाचा निर्माण कार्य सुरू असून काल रात्री ज्या ठिकाणी जाळपोळ झाली, त्याठिकाणी उड्डाणपूल बांधणाऱ्या एनसीसी कंपनीच्या दोन क्रेन आणि जेसीबी जाळून टाकण्यात आल्या.

त्यानंतर कंत्राटदाराने दक्षता म्हणून सुरक्षेसाठी आपला सर्व साहित्य आणि मोठ्या मशिनरीज त्या ठिकाणाहून उचलल्या आहे. घटनास्थळी क्रेन आणून मोठमोठे जनरेटर उचलून ट्रकवर लादून ते सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यामुळे येणारे काही दिवस तरी उड्डाणपूलचे बांधकाम स्थगित राहील अशीच शक्यता आहे. त्यामुळे काही माथेफिरुंनी घातलेल्या धुळगुसामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यात दोन्ही गटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सय्यद जलील यांचं नागपूरच्या हंसापुरी भागात गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या  7 कार उभ्या  होत्या. दंगलखोरांनी त्या सर्व गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. शेजारी असलेल्या दुसऱ्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हंसापुरी परिसरात दोन गॅरेज मधील एकूण 13 वाहनांची तोडफोड झाली. भारतात इतके दंगे झाले. मात्र, नागपूर कधी अशी स्थिती नव्हती. हे बघून आम्हाला पण धक्का बसला, अशी प्रतिक्रिया सय्यद जलील यांनी दिली. नागपूरच्या हंसापुरी भागात  देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली. एकाच परिसरात 15 वाहनांची जाळपोळ करण्यात आली . यात आशा खोब्रागडे यांच्या एकट्यांच्या घरच्या 3 दुचाकी जाळण्यात आल्या. ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष केल्याचा आरोप आशा खोब्रागडे यांनी केला.

अन् बावनकुळेंनी दंगलप्रवण क्षेत्रात जाण्याचा निर्णय बदलला

संचारबंदी लागू केलेली असताना काल दगडफेक, जाळपोळ झालेल्या भागात जाणे योग्य नाही, असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा ताण नाहक वाढेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून घटनेबद्दलची माहिती घेतल्यानंतर बावनकुळे आता जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=LCQJ6z9lqdw

आणखी वाचा

त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!

अधिक पाहा..

Comments are closed.