IPL 2025 पूर्वी के.एल. राहुल महाकाल चरणी! राहुलचा भक्तिमय अंदाज

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे, तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू के एल राहुल याने आयपीएल सुरू होण्याआधी उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. येथे त्याने चांदी दरवाजा पासून ईश्वर महादेव यांची पूजा भक्ती करत आशीर्वाद घेतला. या हंगामात तो नव्या संघामध्ये खेळणार आहे, तसेच तो लवकरच बाबा होणार आहे. त्याने त्याच्या पत्नीसाठी तसेच होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी तसेच उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना केली.

के एल राहुल याआधी लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी आणि पंजाब किंग्स संघासाठी त्याने नेतृत्व केले आहे. या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने 14 करोड रुपयांना मेगा लिलावात खरेदी केले होते. सर्वांना आशा होती की त्याला या संघाचा कर्णधार केले जाईल, पण संघाने अक्षर पटेलवर ही जबाबदारी सोपवली आहे. तसेच संघाचे उपकर्णधार पद डुप्लेसीकडे सोपवलं आहे. तसेच काही रिपोर्ट्स मधून एक गोष्ट समोर येत आहे की, कर्णधार पदासाठी राहुलचेच नाव पहिल्यांदा पुढे होते. पण त्याने स्वतःच अक्षर पटेलला कर्णधार पद सोपवण्यासाठी सांगितले.

भारतीय संघाचा खेळाडू के एल राहुल 17 मार्च रोजी महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्याने चांदी दरवाजातून दर्शन घेतले. डोक्याला अष्टगंध लावून नंतर त्याने आकड्यांचा हार घातला,यानंतर तो नंदी हॉलमध्ये गेला तेथे त्याने नंदीच्या कानामध्ये इच्छा मागितली.

तसेच लवकरच के एल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी लवकरच आई बाबा होणार आहेत. त्यामुळे राहुलने दोघांच्या आरोग्यासाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना केली.

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंची यादी (2025)
अक्षर पटेल (कर्नाधार), करुन नायर, जेक-फ्रेशर-मॅकबर्ग, एफएएफ ड्युपेली, ट्रॅस्टन स्टॅब्स, अभिषेक पोरेल, डोनोव्हन पेरेरा, केएल राहुल, समीर रिझवी, आशुटोश शर्मा, वध्यरतुरा, विपरम उल्दीप यादव, माशली तिवारी, माशली तिवारी, माशेल स्टार्क शर्मा, टी नटराजन, मुकेश कुमार.

Comments are closed.