VIDEO : 6,6,6,6 आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य
टिम सेफर्टने शाहिन आफ्रिदीच्या एका षटकात 4 षटकार ठोकले: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील ओव्हरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतलाय. पाकिस्तानकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या बॉलवर सेफर्टने फ्रंटफुटवर येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफर्टने पुन्हा षटकार लगावले. आफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरलाय. त्याने एकाच षटकात 26 धावा दिल्या.
टिम सेफर्टने 119 मी सहा “ईगल” शाहिन आफ्रिदी विरुद्ध.#Pakvsnz #Nzvpakpic.twitter.com/nuhnlvh7w3
– फील्ड व्हिजन (@फील्डव्हिजनइंड) मार्च 18, 2025
टिम शेअरिंग अर्धवर्तुळ ग्रिस
संपूर्ण सामन्यात टिम सफर्टने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, टी 20 क्रिकेटमधील 10 वे अर्धशतक झळकवेल, असं वाटत असताना तो 45 धावांवर बाद झाला. त्याने 22 चेंडूमध्ये 204.55 स्ट्राईक रेटने 45 धावा कुटल्या. यावेळी त्याने एकूण 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अली याने त्याला बाद केले.
शाहिन अफ्रिदीच्या 3 षटकांमध्ये 31 धावा कुटल्या
शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने एकूण तीन षटके टाकली. दरम्यान, त्याने 6.70 च्या इकॉनॉमीसह 31 धावा केल्या. मात्र त्याला काही यश मिळाले नाही.
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
ड्युनेडिनमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात 15 षटकांत नऊ गडी गमावून 135 धावा केल्या. विरोधी संघाने दिलेले 136 धावांचे लक्ष्य किवींच्या संघाने 13.1 षटकांत पाच गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान सेफर्टने 22 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले तर फिन ऍलनने 16 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले.
टिम सेफर्टने शाहिन आफ्रिदीविरुद्ध षटकात 4 षटकार फोडला. 🥶pic.twitter.com/q4jcttw9ar
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) मार्च 18, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
सानियाशी घटस्फोट पण मुलासोबतच्या नात्याचं काय? शोएब मलिक म्हणाला,…’आम्ही दुबईत’
अधिक पाहा..
Comments are closed.