इंग्लंड दौऱ्यापूर्वी गांगुलींचा रोहितला खास सल्ला , कसोटी क्रिकेटमध्ये भारत कमकुवत?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. पण भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करता येत नाही आहे. न्युझीलंडकडून भारतीय संघाला घरच्या मैदानावर 0-3 ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाकडून 1-3 ने कसोटी मालिकेत पराभव पत्करला. त्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला. आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचं म्हणणं आहे की, रोहित शर्माने संघामध्ये बदल करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
माजी कर्णधार गांगुली यांनी रेवस्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, मागच्या 4-5 वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने चांगलं प्रदर्शन केलं नाही. भारतीय खेळाडू आणि रोहित शर्मा आत्तापर्यंत जे काही करत आले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने ते चांगलं प्रदर्शन करू शकतात. त्यांनी त्यांचे विचार बदलायला हवेत. कारण भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि ही मालिका अवघड असणार आहे. ज्या प्रकारे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका झाली. टीम इंडियाला टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित शर्माची खूप साथ लागणार आहे.
माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रोहित शर्माला सल्ला दिला आहे ते म्हणाले टीम इंडिया आता कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत संघ नाही, त्यामुळे रोहित शर्माला संघाची जबाबदारी घेण्याची गरज आहे, रोहितने संघाला जिंकण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मी ह्या गोष्टीने आश्चर्यचकित नाही की, रोहित ने भारतीय संघाला मर्यादित षटकात क्रिकेटमध्ये नव्या उंचीवर पोहोचवले आहे. मला माहिती नाही की, तो कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं चालू ठेवेल की नाही. पण जर तो माझी गोष्ट ऐकत असेल, तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाबद्दल बदल घडवण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. वर्तमानात भारतीय संघाचं कसोटी क्रिकेट मधील प्रदर्शन चांगले नाही. आणि याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय संघाने खेळण्याची नवीन पद्धत शोधली पाहिजे.
भारतीय संघ आयपीएल स्पर्धेनंतर जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर 5 कसोटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे . 20 जून रोजी पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तसेच दौऱ्यामध्ये अंतिम कसोटी सामना 31 जुलैपासून सुरू होईल.
Comments are closed.