IPL 2025 आधी श्रेयस अय्यर भावुक, पंजाब किंग्सचा नवा कर्णधार काय म्हणाला?
आगामी आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने त्याच्या झालेल्या इंटरव्यूमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मागच्या काही काळात श्रेयस अय्यरच्या आयुष्यात खूप चढाव उतार येऊन गेले. आधी त्याला भारतीय कसोटी संघामधून बाहेर करण्यात आले, परत सेंटर कॉन्ट्रॅक्ट मधून सुद्धा रद्द करण्यात आले. पण श्रेयसनी या सर्व गोष्टींना एका आव्हानाच्या रूपामध्ये पाहिले आणि मजबुतीने या सगळ्यांचा सामना केला.
न्यूज एजन्सी पीटीआयला दिलेल्या इंटरव्यू मध्ये श्रेयस अय्यरने त्याच्या मनातील गोष्टी उघड केल्या. श्रेयस अय्यरने त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल तसेच त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून रद्द केले. या सर्व गोष्टी झाल्या तरीही त्याने इमानदारीने आणि शांत डोक्याने स्वतःवर विश्वास ठेवून तो न डगमगता पुढे आला या गोष्टीचं त्याला पुढे चांगलंच फळ मिळालं. मागच्या काही काळात तो भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तसेच भारतीय संघासाठी तो सर्वात विश्वासू फलंदाज ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने श्रेयसला शांत हिरो संबोधले.
शॉर्ट चेंडू विरुद्ध त्याची कमजोरी असलेल्या गोष्टीबद्दल श्रेयस म्हणाला की, या गोष्टीमुळे सर्वांनी समज करून घेतला आणि मला टाईपकास्ट केले गेले. पण मला माझ्या ताकदीवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.
मागच्या 8 वनडे मध्ये त्याने चौथ्या नंबर वर 53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याबद्दल तो म्हणाला, खेळ बदलत राहतो, तसेच खेळाडूला सातत्याने त्याच्या खेळाच्या प्रदर्शनामध्ये सुधारणा करावी लागते. मला आनंद आहे की, मी सकारात्मक विचारांनी खेळू शकलो आणि स्वतःवर विश्वास ठेवला.
मागच्या वर्षी इंग्लंड विरुद्ध घरेलू कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या कमरेला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर पडावे लागले. तसेच त्यावेळी तो आयपीएल संघ कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत सराव करत होता, त्याऐवजी त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळायचे होते.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याने भारतीय वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या आयपीएल हंगामात श्रेयस पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस म्हणाला, मी माझा खेळ माझ्या पद्धतीने खेळतो, मी जास्त विचार करत नाही आणि इमानदारीने काम करतो. त्यामुळेच मला विश्वास होता की, माझ्या इमानदारी आणि माझ्या खेळातील प्रदर्शनामुळे मला संधी नक्कीच मिळेल.
Comments are closed.