सिडकोची मनमानी, नगरविकास मंत्र्यांचा आदेशही जुमानत नाही; अंबादास दानवेंनी उपस्थित केला खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीचा मुद्दा

खारघर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीला सिडकोने सहा वर्षांच्या मेटेनन्स एकत्र पाठवला असून ती रक्कम दोन लाखांपर्यंत आहे. या सोसायटीत मध्यम आणि अल्प उत्पन्न धारकांची घरे आहेत. त्यांनी एवढी मोठी रक्कम एकत्र भरणे शक्य नाही. याबाबतचा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित करत सिडकोची मनमानी सुरू असून ते नगर विकास मंत्र्यांच्या आदेशही जुमानत नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे याबाबत म्हणाले की, खारघर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीतील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार दिली होती. 10 हजार नागरिक येथे राहतात. सिडको विभागाने अचानक येथे सहा वर्षांचा मेटेनन्स एकत्र पाठवला आहे. तसेच हा मेटेनन्स भरला नाही तर सेवा-सुविधा थांबवण्याचा इशारा दिला आहे. सिडकोने इमारतीचे मेटेनन्स वेळोनेळी करत त्याचे बिल सोसायटीला पाठवण्याची गरज होती. या सोसायटीला अवढी वर्षे होऊनही सोसायटी का स्थापन करण्यात आली नाही. तसेच पाठवलेल्या बिले अवाजवी असल्याचे दिसून येते. तसेच याबाबत नगरविकास मंत्र्यांनी सिडकोस आदेश देऊनही या विभागाने त्यांचा आदेश ऐकला नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या प्रश्नाची दखल घेण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.
Comments are closed.