IPL 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा थरार, विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार?

आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात होण्यास अवघे चार दिवस बाकी आहेत. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी सनराजर्स हैदराबाद संघ त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना होम ग्राउंड वर राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे.

आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स संघ खूप मजबूत दिसत आहे. तसेच चाहते या संघाला तुफानी संघ म्हणत आहेत. मागच्या हंगामात हा संघ अंतिम सामन्यामध्ये केकेआर संघाकडून पराभूत झाला होता. पण या हंगामात संघ मात्र मागच्या हंगामापेक्षाही जास्त मजबूत दिसत आहे. हैदराबाद संघामध्ये खूप शानदार खेळाडू तसेच टी20 स्पेशालिस्ट खेळाडू आहेत.

संघाच्या प्लेइंग 11 बद्दल बोलायचे झाल्यास दोन भाऊ आणि दोन तुफान म्हणजेच अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड‌ डावाची सुरुवात करतील. तीन नंबर वर ईशान किशन खेळणार आहे. तसेच टॉप ऑर्डरमध्ये तीनही खेळाडू टी20 मधील माहेर खेळाडू आहेत. यानंतर चौथ्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डी तर पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक हेन्रीक क्लासेन खेळेल, हे दोन्ही खेळाडू गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

यानंतर सहाव्या क्रमांकावर अभिनव मनोहर खेळू शकतो.अभिनव भारतीय घरेलू क्रिकेटमधील शानदार फलंदाज आहे. सात नंबर वर वियाम मुल्डर याला संधी मिळू शकते. हा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मध्ये संघासाठी गेमचेंजर ठरू शकतो.

गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, पेस अटैक खूप घातक गोलंदाज आहे. तसेच कर्णधार पैट कमिंस सोबत मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल हे खेळाडू असतील, हे तीनही खेळाडू फलंदाजांसाठी अडचण ठरू शकतात. तसेच फिरकीपटू राहुल चाहर संघात सामील आहे, तसेच एडम जम्पा सुद्धा आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन :-
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीष कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यशर रक्ष), अभिनव मनोहर, व्हियान मुलडर, पॅट कमिन्स (कर्नाधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी अनी अनीहुल चाहर.

Comments are closed.