कृषिमंत्री कोकाटे यांना दिलासा, सत्र न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

मुख्यमंत्री कोटय़ातून कमी दरात सदनिका मिळविण्यासाठी कागदपत्रांत फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली गोत्यात आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला. न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब केली.
नाशिक सत्र न्यायालयाच्या स्थगिती आदेशाविरोधात शरद शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी सुनावणीवेळी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाने या राठोड यांच्या दोन याचिका फेटाळून लावल्यास आमचीही याचिका फेटाळली जाईल, आम्हाला बाजू मांडता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने तातडीने स्थगिती देऊ नये, न्यायालयाने याची दखल घेत कोकाटे यांच्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करून सुनावणी तहकूब केली.
Comments are closed.